३० नोव्हेंबरच्या सकाळी, आदल्या दिवशी दिल्लीच्या चार दिशांहून रामलीला मैदानावर पोचलेले देशभरातले हजारो शेतकरी संसद मार्गाच्या दिशेने मोर्चात निघाले. सोबत होतं त्यांचं सामानसुमान आणि काही मागण्या, ज्यातली महत्त्वाची मागणी होती – शेतीवरच्या अरिष्टावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं.

रामलीला मैदानावर सकाळी नाश्त्यासाठी थांबलेले शेतकरी.

मोर्चाला निघण्याआधी, एक शेतकरी सकाळी एक डुलकी काढतोय.

तमिळ नाडूच्या कुडलूर जिल्ह्यातल्या कट्टूमन्नरकोइल तालुक्याच्या कंजनकोल्लई गावचे, कोदंड रामन हे शेतकरी वर्तमानपत्रात किसान मुक्ती मोर्चाच्या बातम्या आल्या आहेत का ते पाहतायत.

महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांचा पारंपरिक नाच.

आपापल्या गावच्या, जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र आणून मोर्चासाठी शेतकरी सज्ज झालेत.

रामलीला मैदान ते संसद मार्गावरचे मोर्चेकरी.

शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ दिल्लीकरही घरं सोडून रस्त्यावर आलेत.

संसद मार्गावर मोर्चेकरी येऊ लागल्यावर त्यांना पाणपुडे देणारे सेवाभावी कार्यकर्ते.

रामलीला मैदानापासूनचं मोठं अंतर पार केल्यावर पंजाबच्या शेतकऱ्यांचा हा गट जरा विसावलाय.

संसद मार्गावर उभारलेल्या मंचासमोर बसून शेतकरी नेते आणि राजकारण्यांची भाषणं ऐकताना.
अनुवादः मेधा काळे