• पारीने केलेल्या मोर्चा वृत्तांकन मालिकेच्या संपादकः शर्मिला जोशी, संपादन प्रमुख, पारी
  • छायाचित्र संपादनः बिनायफर भरूचा
  • मजकूर समन्वयः सुबुही जिवानी, संयुक्ता शास्त्री, सिंचिता माजी, ज्योती शिनोळी

पंजाबच्या शेतकऱ्याचं गहिरं गाणं

नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याने बेरोजगारी, कर्ज आणि हताशेबाबतचं एक हेलावून टाकणारं गाणं गायलं. जरूर ऐका

२७ डिसेंबर २०१८ । बिनायफर भरूचा

From fields and ploughs to Parliament Street
Binaifer Bharucha • New Delhi, Delhi

शेती आणि नांगरटीतून संसद मार्गाकडे

३० नोव्हेंबर २०१८ रोजी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या हातातल्या फडकत्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या झेंड्यांनी दिल्लीचे रस्ते न्हाऊन निघाले. घोषणा देत हे शेतकरी संसद मार्गाच्या दिशेने निघाले. अनेक दशकांपासून गहिऱ्या कृषी संकटाचा सामना करणारे हे सारे भारताच्या राजधानीत आपलं अस्तित्व दाखवून द्यायला आणि आपला म्हणणं मांडायला आले आहेत

२७ डिसेंबर २०१८ । बिनायफर भरुचा

शेतकऱ्यांचं आंदोलन – बिहार ते आनंद विहार

गेल्या महिन्याच्या शेवटी, २९-३० नोव्हेंबरच्या किसान मुक्ती मोर्चासाठी बिहारहून आलेले शेतकरी दिल्लीच्या आनंद विहार स्थानकात गोळा झाले होते. सोबतच्या चित्रफितीत ते त्यांच्या समस्या आणि अपेक्षांबद्दल बोलतायत.

४ जानेवारी २०१९ । नमिता वाईकर व संयुक्ता शास्त्री

हिमाचलच्या एकाकी कास्तकार

दिल्लीतल्या २९-३० नोव्हेंबरच्या किसान मुक्ती मोर्चाला आलेल्या शिमला जिल्ह्यातल्या शेतकरी बाया सोबतच्या चित्रफितीत आपल्याला नव्याने जाणीव करून देतायत की शेतीतलं बरचसं काम हे बायाच करतात

४ जानेवारी २०१९ । सुबुही जिवानी

स्वातंत्र्य सैनिकांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

हौसाबाई पाटील आणि रामचंद्र श्रीपती लाड – महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातले नव्वदी पार केलेले स्वातंत्र्य सैनिक – कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देतायत. त्यांच्या चित्रफिती पहा

९ जानेवारी २०१९ । भारत पाटील

Glimpses from the Mukti Morcha
Anushka Jain • New Delhi, Delhi

मोर्चाची क्षणचित्रं

मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळ नाडू आणि तेलंगणचे शेतकरी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी दक्षिण दिल्लीच्या गुरुद्वारा श्री बाला साहेबजीपासून मध्य दिल्लीतल्या रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढून चालत गेले

५ डिसेंबर २०१८ । अनुष्का जैन

आधाराला काठ्या, पापड, गूळ, हुक्का आणि पत्ते

२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चामध्ये काही विरंगुळ्याचे क्षणही होते, तोंडात टाकायला खाऊ, हुक्क्याचे झुरके, खेळ, फोनवरचे व्हिडिओ, आपलं सामानसुमान वाहून नेण्याच्या अतरंगी क्लृप्त्या आणि बरंच काही

५ डिसेंबर २०१८ । राहुल एम.

Five farmers speak of their demands
Chetana Borkar • New Delhi, Delhi

पाच शेतकऱ्यांच्या मागण्या

विविध राज्यातल्या शेतकऱ्यांचे नेमके मुद्दे आणि मागण्या काय होत्या­? आम्ही पाच शेतकऱ्यांना हा सवाल केला

५ डिसेंबर २०१८ । चेतना बोरकर

ओडिशातील शेतकऱ्यांच्या दुष्काळ आणि रोजगाराच्या व्यथा

२९-३० नोव्हेंबर, २०१८ रोजी दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चात, सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात चालता चालता  ओडिशा आणि इतर राज्यांतून सहभागी झालेले शेतकरी, मजूर आणि कार्यकर्ते त्यांच्या रोजच्या समस्या बोलून दाखवत होते

२८ डिसेंबर २०१८ । पुरुषोत्तम ठाकूर

मोर्चामधला क्षणभर विसावा

२९ व ३० नोव्हेंबर २०१८ रोजी देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातल्या आपल्या मुक्कामांपासून रामलीला मैदानापर्यंत आणि नंतर संसद मार्गाकडे मोर्चा नेला. मोर्चाच्या मध्ये काहींनी क्षणभर विसावा घेतला त्याची ही क्षणचित्रं

४ डिसेंबर २०१८ । सुबुही जिवानी

Children of farmers at the Delhi march
Sanket Jain • New Delhi, Delhi

दिल्लीतल्या मोर्चातली शेतकऱ्यांची लेकरं

२९-३० नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्लीत आलेल्या मोर्चामध्ये काही शेतकऱ्यांची लेकरंही सहभागी झाली. आपल्या पालकांबरोबर ही कच्चीबच्ची आली कारण कदाचित तिकडे घरी त्यांना सांभाळायला कुणी नसावं

४ डिसेंबर २०१८ । संकेत जैन

रस्त्यावरचं आणि मतदान पेटीतलं मतदान

मध्य प्रदेशच्या विधान सभेसाठी मतदान करून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीची गाडी पकडली. ‘मध्य प्रदेशात तर आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही म्हणून आम्ही दिल्लीत आमचं म्हणणं ऐकवायला आलो आहोत’ ते सांगतात

१७ डिसेंबर २०१८ । पार्थ एम एन

ढोल, झांजा आणि घुंगरं – शेतकऱ्यांच्या मोर्चातले नर्तक

२९-३० नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात अनेक जण आपापली पारंपरिक वाद्यं घेऊन आले, आपली ओळख, आवाज आणि मागण्या जोरकसपणे मांडून गेले

१ डिसेंबर २०१८ । चेतना बोरकर

Marching from Majnu ka Tila to Ramlila
Guru Dhamal and Binaifer Bharucha • New Delhi, Delhi

मोर्चा निघाला मजनू का टिला ते रामलीला

पंजाब आणि हिमाचल प्रदेशातले शेतकरी गुरुद्वारा मजनू का टिला इथल्या आपल्या मुक्कामापासून २९ नोव्हेंबर रोजी मध्य दिल्लीतल्या रामलीला मैदानाच्या दिशेने मोर्चात निघाले, सोबत त्यांना मदत करण्यासाठी अनेक विद्यार्थी आले होते

१ डिसेंबर २०१८ । गुरू ढमाल व बिनायफर भरुचा

संसदेचा लांबचा पल्ला

रामलीला मैदानावर रात्र काढल्यानंतर ३० नोव्हेंबरच्या सकाळी हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन संसदेच्या दिशेने निघाले

३ जानेवारी २०१९ । संकेत जैन

परतीच्या वाटेवरची नवी उमेद

खडतर, लांबलचक प्रवास करून दिल्लीत पोचलेल्या शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरला संसद मार्गाच्या दिशेने मोर्चा काढला, घोषणा देत, गात आणि आपल्या मागण्या मांडत. त्यानंतर आता आपल्या शेतीकडे परतायला ते सज्ज झाले आहेत

१७ डिसेंबर २०१८ । पार्थ एम एन

Jhabua's protesting farmers in Delhi
Purusottam Thakur • New Delhi, Delhi

झाबुआचे आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखल

शेतीतला लागवडीचा खर्च कमाईपेक्षा खूपच जास्त असल्याचं मध्य प्रदेशातल्या झाबुआचे शेतकरी सांगतात. त्यांच्या पिकांसाठी त्यांना चांगले भाव हवे आहेत

३० नोव्हेंबर २०१८ । पुरुषोत्तम ठाकूर

Kisan Mukti Morcha: On the road from Bijwasan
Chetana Borkar • New Delhi, Delhi

किसान मुक्ती मोर्चाः बिजवासनहून मार्गस्थ

२९ नोव्हेंबर रोजी नैऋत्य दिल्लीकडील बिजवासन इथे मुक्कामी असलेले शेतकरी आपला निषेध मोर्चा घेऊन रामलीला मैदानाच्या दिशेने निघाले

३० नोव्हेंबर २०१८ । चेतना बोरकर

मोर्चासोबत बिजवासन ते रामलीला मैदान

राजस्थान, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातले शेतकरी २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी येत आहेत

३ जानेवारी २०१९ । संकेत जैन

शिस्तबद्ध, दृढनिश्चयी आणि आशावादी

काल, २९ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्रातले आणि अन्य राज्यातले शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोर्चा काढून गेले. आज, ते आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा मोर्चा संसदेच्या दिशेने निघेल

३० नोव्हेंबर २०१८ । पार्थ एम एन

अनंतपूर ते दिल्लीः अलिवेलम्माचा ताईत

खंडाने शेती करणाऱ्या सी. अलिवेलम्मांच्या मनात एकच आशा आहे, त्यांच्या पतीने मरण कवटाळलं तशी वेळ इतर कुणावर येऊ नये

२० डिसेंबर २०१८ । राहुल एम.

‘कोणतं पण पीक घ्या, आमच्या पदरी घाटाच आहे’

२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी आलेल्या सुंदरबनच्या महिला शेतकरी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मनातल्या आशेबद्दल बोलतायत

१७ डिसेंबर २०१८ । नमिता वाईकर व संयुक्ता शास्त्री

डहाणू ते दिल्ली, जागेसाठी आणि इतरही अनेक मागण्यांसाठीचा संघर्ष

पालघर जिल्ह्यातल्या वारली शेतकरी बाया तीन रेल्वे बदलून २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी निघाल्या आहेत. खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्यात त्यांच्या चळवळीच्या गाण्यांनी बहार आणली

१२ डिसेंबर २०१८ । सिद्धार्थ आडेलकर व हिमांशु छुतिया सैकिया

दिल्लीच्या मोर्चातले दुष्काळाने होरपळलेले यवतमाळचे कास्तकार

२९-३० नोव्हेंबरच्या दिल्लीतल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या पहिल्या काही गटांपैकी होते विदर्भातले काही आदिवासी शेतकरी – त्यांना त्यांच्या समस्या सगळ्यांसमोर मांडायच्या होत्याच पण सध्या त्यांच्या समोरची सर्वात मोठी चिंता समस्या म्हणजे भयंकर असा दुष्काळ

२० डिसेंबर २०१८ । नमिता वाईकर व संयुक्ता शास्त्री

ग्रामीण गरिबांच्या समर्थनात शहरी गरीब

दिल्लीतल्या एका वस्तीतले लोक २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन करतायत

३ जानेवारी २०१९ । सुबुही जिवानी व आदित्य दिपांकर

'We were also farmers...'
and • New Delhi, Delhi

‘आम्हीदेखील शेतकरीच होतो...’

उत्तर दिल्लीच्या एका भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या आदल्या दिवशी भाजी विक्रेते शेतीवरच्या अरिष्टाबद्दल बोलतायत

२९ नोव्हेंबर २०१८ । पुरुषोत्तम ठाकूर

रामलीला मैदानावरती मोर्चाची तयारी

२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानात मांडव टाकण्याची तयारी सुरू आहे आणि हे काम करणारे कामगारदेखील शेतकरी कुटुंबातले स्थलांतरित कामगार आहेत

४ जानेवारी २०१९ । पार्थ एम एन

‘माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी मी मोर्चाला निघालीये’

डहाणूच्या आदिवासी शेतकरी महिला रेल्वेने शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी दिल्लीला का चालल्या आहेत ते सांगतायत

२० डिसेंबर २०१८ । सिद्धार्थ आडेलकर

किसान मोर्चाः दिल्लीकर काय म्हणतायत?

उद्या, २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विराट किसान मोर्चाविषयी दिल्लीकर नक्की म्हणतायत तरी काय?

२० डिसेंबर २०१८ । संकेत जैन

डोंबिवलीच्या ऑटोत एक मोहीम स्वार

रविवारी डोंबिवलीतील ऑटोरिक्षा चालकांनी एकत्र येऊन प्रवाशांना कृषी संकटावर संसदेत विशेष अधिवेशनाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सही करण्याची आणि येत्या आठवड्यात दिल्लीत होऊ घातलेल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

२९ डिसेंबर २०१८ । सिद्धार्थ आडेलकर

रानातल्या मरणानंतरचं जिणं

नवऱ्याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातल्या – स्वतः शेतकरी असणाऱ्या - हजारो विधवा दुःखात, शोकात, कर्जात, हलाखीत आणि कागदपत्रांच्या आणि प्रशासकीय दिरंगाईच्या बोजाखाली दबून गेल्या आहेत

१७ डिसेंबर २०१८ । शर्मिला जोशी

संसदेचं एक विशेष अधिवेशन भरवायलाच हवं...

येत्या २९-३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मोर्चाविषयी पी. साईनाथ काय म्हणतायत ते पहा

१९ नोव्हेंबर २०१८ । पी. साईनाथ

अनुवादः मेधा काळे

Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale